उर्मिला मातोंडकरचा चित्रपट पाहताना सच्च्या चाहत्याप्रमाणे शक्ती कपूरने थिएटरमध्ये उभे राहून केले उर्मिलाचे अभिनंदन!

| 28-08-2022 7:00 PM 11

तरूण मुला-मुलींनाही तीव्र स्पर्धा निर्माण करील अशी उत्कृष्ट नृत्ये सादर करणार््या काही अपवादात्मक उत्कृष्ट मातांचे दर्शन प्रेक्षकांना घडविणार््या ‘डीआयडी सुपर मॉम्स’च्या पूर्वीच्या दोन आवृत्त्यांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर ‘झी टीव्ही’ने आपल्या या लोकप्रिय मालिकेची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रसारित केली आहे. दर शनिवार-रविवारी रात्री 9.00 वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण केले जात आहे. या नव्या आवृत्तीत नामवंत नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझा, भाग्यश्री दस्सानी आणि उर्मिला मातोंडकर हे तिघेजण परीक्षक म्हणून काम पाहणार असून या मातांना आपली नृत्यांगना होण्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत करणार आहेत. 

‘डीआयडी सुपर मॉम्स’च्या प्रारंभापासूनच आठवड्यांमागून आठवडे प्रेक्षकांना या 12 गुणी सुपर मॉम्सनी सादर केलेली काही काही अफलातून नृत्ये पाहायला मिळत आहेत. या वीकेण्डच्या कॉमेडी स्पेशल भागात नामवंत अभिनेते शक्ती कपूर आणि चंकी पांडे हे विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार असल्याने ती प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरेल. सर्वच स्पर्धकांनी या भागात उत्तम नृत्ये सादर केली असली, तरी एक स्पर्धक वर्षा बुमरा हिने ‘पागल’  या गाण्यावर सादर केलेल्या नृत्याने सर्वजण मंत्रमुग्ध झाले. या नृत्याची सर्वांनीच भरपूर प्रशंसा केली, तरी यावेळी शक्ती कपूरने दिलेल्या एका प्रांजळ कबुलीजबाबाने सर्वजण थक्क झाले. शक्तीने सांगितले की आपण उर्मिला मातोंडकरचा फार मोठा चाहता असून वर्षाने केलेल्या या नृत्याने आपल्याला उर्मिलाच्या पदन्यासाची आठवण करून दिली. त्याच्या या प्रशंसेमुळे उर्मिला लाजून गेली.

शक्ती कपूर म्हणाला, “मी जेव्हापासून डीआयडी सुपर मॉम्सच्या सेटवर आलो आहे, तेव्हापासून मला एक कबुली द्यायची आहे. मी जर आज ही गोष्ट इथे सांगितली नाही, तर रात्री माझं जेवण घशाखाली उतरणार नाही. मी उर्मिला मातोंडकरचा खूप मोठा चाहता आहे, ही गोष्ट फारशी कुणाला ठाऊक नाहीये. मी चित्रपटगृहात जेव्हा तिचा छम्मा छम्मा हा नाच पाहिला, तेव्हा मी त्या थिएटरमध्ये उभा राहून जोरजोरात टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन केलं होतं. चित्रपटसृष्टीत आज उर्मिलाजी ही एक सर्वोत्कृष्ट आणि शालीन नृत्यांगना आहे. मी आयुष्यात काही मोजकी गाणी कधीच विसरू शकणार नाही आणि छम्मा छम्मा हे त्यापैकी एक गाणं आहे.”
शक्ती कपूरची ही कबुली आणि त्यावर उर्मिलाची लाजणारी प्रतिक्रिया पाहून जर तुम्ही चकित झाला असाल, तर या स्पर्धेतील अन्य सुपर मॉम स्पर्धकांनी सादर केलेली बहारदार नृत्या पाहायला विसरू नका.
या गुणी मातांची उत्कृष्ट नृत्ये पाहण्यासाठी पाहा ‘डीआयडी सुपर मॉम्स’ शनिवार-रविवारी           रात्री 9.00 वाजता फक्त ‘झी टीव्ही’वर!